नवी दिल्ली : विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सना आपल्या मालिकांसाठी सिरीयल कीलिंग हा एक महत्त्वाचा आणि आवडीचा विषय आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सिरीयल किलर हा विषय चर्चेत आला आहे.
रामन राघवन सायनाइड मलिका ऑटो शंकर किंवा चंद्रकांत झा यासारख्या अनेक सिरीयल किलरची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असली तरी नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, देशात सिरीयल किलिंग या विषयांमध्ये छत्तीसगड सारखे छोटे राज्य आघाडीवर आहे. 2000 ते 2021 या 21 वर्षांच्या कालावधीमध्ये छत्तीसगडमध्ये तब्बल 175 लोकांच्या हत्या अशाप्रकारे करण्यात आल्या आहेत. वर उल्लेख केलेले कुख्यात सीरियल किलर महानगरांमध्ये केंद्रित होते. त्यांनी केलेला हत्या महानगरांत झाल्या होत्या पण आता सिरीयल किलिंगच्या विषयांमध्ये छत्तीसगड सारखे राज्य आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या ताजा अहवालाप्रमाणे सिरीयल किलिंगमध्ये गुजरात दुसऱ्या नंबरला मध्यप्रदेश तिसरा नंबर ला आणि महाराष्ट्र चौथ्या नंबरला आहे. अहवालातील माहिती प्रमाणे 2021 या वर्षामध्ये सर्वात कमी तेरा सिरीयल किलिंग झाल्या गेल्या बावीस वर्षांत देशात एकूण 1137 लोकांच्या अशा प्रकारे हत्या करण्यात आल्या. ज्या फक्त देशातील पाच राज्यांमध्ये घडल्या असून त्यामध्ये छत्तीसगड आघाडीवर आहे.
एखादया व्यक्तीकडून ठराविक अंतराने जेव्हा एकापेक्षा जास्त हत्या केल्या जातात तेव्हा त्याला सिरीयल किलिंग मानले जाते अशा प्रकारचे कृत्य करणारा माणसाला मानसिक विकृती असलेला माणूस मानले जाते. हे किलर्स इतर माणसांपेक्षा वेगळे असतात ते नेहमी एकटे राहणे पसंत करतात कोणत्याही एखाद्या किरकोळ कारणाने ते खुनाची मालिका सुरू करतात खुनाचे कारण अतिशय वेगळे आणि किरकोळ असल्यानेच खुन्यापर्यंत पोचणे अनेक वेळा अवघड होते.