पुणे – शुक्रवार दि. 9 सप्टेंबर रोजी असणार्या अनंत चतुर्दशी/गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी दोन वर्षाच्या ब्रेकनंतर या वर्षी पुणे शहरात गर्दीचा उच्चांक होण्याचा अंदाज आहे, तसेच मिरवणूक शनिवारी (10 सप्टेंबर) दुपारी उशिरा पर्यन्त चालू असण्याची शक्यता आहे.त्यामुळे ट्राफिक मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.
आज गुरुवार संध्याकाळी 7 नंतर लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, टिळक रोड, केळकर रोड (नारायण पेठ) यांना जोडणाऱ्या सर्व गल्ल्या बांबू लावून बंद करायला सुरुवात होईल. तसेच जंगली महाराज रोड, FC रोड, नळ स्टॉप पासून डेक्कन पर्यंतचा कर्वे रोड, नदी पात्रातील रस्ता आज जॅम असणार आहे.
आज संध्याकाळी 5 वाजेपूर्वी आपली सर्व महत्वाची कामे उरकून घ्यावीत तसेच शनिवारी (10 सप्टेंबर) संध्याकाळी 5 वाजे पर्यंत गावातील रस्ते बंद/जॅम राहणार आहेत याची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या कामाचे नियोजन करावे.