मुंबई – अभिनेत्री ईशा गुप्ता तिच्या किलर लूकमुळे चर्चेत सतत असते. ईशा गुप्ता माजी मिस इंडिया असून तिने २००७ मध्ये हा किताब जिंकला होता. त्यानंतर ईशानेसिनेसृष्टीत पदार्पण करून दर्जेदार चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.ईशा नेहमीच हटके स्क्रिप्ट निवडते आणि आपल अभिनय कौशल्य आजमावले.
नुकतीच प्रदर्शित झालेल्या आश्रम या सिरीजमध्ये ईशाचे ‘सोनिया’ नावाचे पात्र साकारले होते ज्यात तिचा बोल्ड लूक सर्वांच्या लक्षात राहिला. ईशाने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे पाहून सर्वजण आश्चर्य चकित झालेत.इशा गुप्ताचा हॉटनेस दिवसेंदिवासी वाढत चालला आहे असं तिच्या चाहत्यांच म्हणणं आहे.
सध्या ईशा गुप्ता स्पेनमध्ये मस्ती करत आहे आणि इंस्टाग्रामवर तिच्या सुंदर दिवसांची झलक सर्वांना दाखवत आहे. ईशाने सोशल मीडियावर स्पेनमध्ये घालवलेल्या एका सुंदर दिवसातील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये ईशा काळ्या पँटमध्ये शॉर्ट रिब ब्लाउजमध्ये दिसत आहे. निळ्या रंगाच्या ब्रॅलेटमध्ये प्लंगिंग नेकलाइन आणि शॉर्ट स्लीव्हजने तिच्या बोल्डनेसमध्ये भर घातली असल्याचे पाहायला मिळते.
View this post on Instagram
ईशाने कॅरी केलेल्या बॅगमुळे तिचा लूक अजूनच खुलून दिसत आहे. ड्रेसला साजेल अशी हेअर स्टाईल केल्यामुळे चाहत्यांनी या फोटोवर कमेंटचा पाऊस पडला आहे. ईशाच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे. ईशा आश्रमाच्या आगामी सिजनमध्ये देखील दिसणार आहे.