मुंबई – दिल्लीस्थित उद्योजक रोहित कपूर यांच्याविरोधात बलात्काराच्या प्रकरणी “लुक आऊट’ नोटीस बजावण्यात आली आहे. रोहित कपूर हे शिवसेना नेते केदार दिघे यांचे जवळचे मित्र आहेत. दिघे यांच्यावरही या प्रकरणी तक्रार देणाऱ्या महिलेला धमकावल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारीच केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केल्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या प्रमुख पदावरून नरेश म्हस्के यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या जागेवर दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
एका 23 वर्षीय युवतीने कपूर यांच्याविरोधात मंगळवारी परळ बागातील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तर दिघे यांच्याविरोधातही धमकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कपूर यांच्याविरोधात पोलिसांनी “लुक आऊट’ नोटीस जारी केली आहे.
कामशेत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारा आरोपी 24 तासांत गजाआड
या संदर्भात पोलीस एका हॉटेलच्या सीसीटिव्हीचे चित्रीकरण तपासत आहेत. तसेच संबंधित महिलेच्या मोबाईल फोनच्या कॉलचे तपशीलही तपासण्यात येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीत खासदारांची “हर घर तिरंगा’ बाईक रॅली; अनेक केन्द्रीय मंत्र्यांचा सहभाग