मुंबई – ‘बस बाई बस’ या मराठी कार्यक्रमात नुकतीच खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. एका मराठी वाहिनीवरती हा कार्यक्रम लवकरच प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ सध्या प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात खासदार सुळे यांनी थेट पंतप्रधानांशी गुजरातीत संवाद साधल्याचे पाहायला मिळते. हा व्हडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
अभिनेता सुबोध भावेनं यावेळी खासदार सुळे यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळेंना काही फोटो दाखवण्यात आले. ज्यावरून त्यांना त्या व्यक्तींसोबत संवाद साधायचा होता. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंतप्रधान मोदींच्या फोटोचा देखील समावेश होता. यावेळी सुप्रिया ताईंनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना पूर्णतः गुजरातीमध्ये संवाद साधल्याचे पाहायला मिळते. सुप्रियाताईंनी अतिशय स्पष्टपणे आणि मनमोकळे पनाने गुजरातीमध्ये संवाद साधल्यामुळे प्रेक्षकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे नेमकं यावेळी
नमस्ते मोदीजी कैसे हे आप ? मै अभी गुजरात हो के आयी, बद्दू सारू छे ! मने फाफडा आपियो ना सुरत मा, सुरत मा गई. अमित भाई पार्लमेंट मे आऊ से सरस भाषण करत से, पण तमे ना आऊ सो, तमे आऊ सो ना मने तमारा भाषण सरस लागे. अशा शब्दात सुळेंनी पूर्ण संवाद गुजरातीमध्ये साधल्याचे पाहायला मिळते.
मराठी वाहिनीवरील या कार्यक्रमाचा हा पहिलाच भाग आहे. त्यात सुप्रिया सुळेंनी लावलेल्या हजेरीमुळे कार्यक्रमाच्या प्रोमोचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय . आगामी भागांमध्ये या कार्यक्रमामध्ये आणखी कोण कोण हजेरी लावणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.