मुंबई – रणवीर सिंग हा स्टाईल आयकॉन म्हणून प्रसिद्ध आहे.आपल्या अतरंगी गेटअपमुळे रणवीर अनेकदा चर्चेत असतो. स्टायलिश वेशभूषा करण्याच्या नादात अनेकदा नेटकरी त्याला ट्रॉल देखील करतात. नुकतंच रणवीरने एक बोल्ड फोटोशूट केलं ज्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रणवीरचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. रणवीरची बायको आणि अभिनेत्री दीपिका पदुकोनने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
चाहत्यांना रणवीरची प्रत्येक स्टाईल आवडते. दरवेळी काहीतरी भन्नाट करणाऱ्या रणवीरने यावेळी पूर्णपणे न्यूड फोटोशूट करून खळबळ उडवून दिली आहे.यानंतर अनेकांच्या या फोटोबाबतच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. रणवीरचे हे फोटो पाहिल्यानंतर दीपिका फारच प्रभावित झाली होती. तिला या फोटोशूटची संकल्पना खूप आवडली असल्याचे आता समोर आले आहे.
रणवीरने इंटरनेटवर हे फोटो पोस्ट करण्यापूर्वी मला दाखवले होते. मलाही ते आवडले होते अशी प्रतिक्रिया अभिनेत्री दीपिकाने दिली. दीपिका ही नेहमीच रणवीरला पाठिंबा देत असते. त्यामुळे जेव्हा रणवीरने हे फोटो शेअर केले तेव्हा ती फारच उत्साही होती. रणवीरच्या अशा फोटोशूटचे अनेकांनी स्वागत केले आहे तर काहींनी यासाठी त्याला ट्रॉल देखील केलं आहे.
https://twitter.com/papermagazine/status/1550153114665230336?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1550153114665230336%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D1327904action%3Dedit
मॅगझीनसाठी केलं फोटोशूट
रणवीर सिंगने एका लोकप्रिय मासिकासाठी हे न्यूड फोटोशूट केले आहे. काही फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे कपड्यांशिवाय दिसत आहे. मस्क्युलर बॉडीसह असलेला रवीराचा लूक पाहून भले भले बॉडी बिल्डर थंड पडले आहेत. रणवीरची अशी स्टाईल या आधी कधीच पाहायला मिळाली नव्हती. हे असे फोटो पाहून तर चाहते सुद्धा चकित झाले आहेत.