नागपूर – नागपूरमध्ये बँकेच्या एटीएममधून 500 रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता खात्यातून अधिक रक्कम न कमी होता 500-500 च्या पाच नोटा बाहेर आल्या आहेत. सदर व्यक्तीने पुन्हा प्रयत्न केला असता, पुन्हा देखील 2500 रुपये बाहेर आहे. ही घटना बुधवारी नागपूर शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या खापरखेडा शहरातील एका खासगी बँकेच्या ऑटोमेटेड टेलर मशीनमध्ये (एटीएम) घडली.
ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरताच त्या एटीएम मशिनजवळ लोकांची मोठी गर्दी झाली. सर्व लोक त्या एटीएम मशीनजवळ जमा झाले आणि पैसे काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांनाही पाच पट रक्कम एटीएममधून मिळाली. मात्र, या घटनेदरम्यान एका बँक ग्राहकाने याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ पोहोचून एटीएम मशिन बंद करून बँकेला घटनेची माहिती दिली.
खापरखेडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे एटीएममधून जादा पैसे बाहेर येत होते. सीसीटीव्ही तपासले जात आहेत. त्याचवेळी बँक अधिकाऱ्याने सांगितले की, 500 रुपयांच्या नोटा चुकून 100 रुपयांच्या ट्रेमध्ये ठेवण्यात आल्याने ही घटना घडली असावी. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
अशा परिस्थितीत बँक काय करणार?
या स्थितीत बँकेकडे कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास ती त्या व्यक्तीची ओळख पटवू शकते. त्या व्यक्तीचे त्याच बँकेत खाते असल्यास पैसे वसूल केले जाऊ शकतात किंवा त्याच्याकडून पैसे परत मागता येतात.
पैसे न काढता खात्यातून पैसे कापले तर?
या स्थितीत ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेकडे तक्रार करावी लागेल. तक्रार केल्यानंतर, तुम्ही एक आठवडा वाट पाहू शकता, या वेळेत तुम्हाला तुमच्या खात्यावर पैसे पाठवले जातात. मात्र तरीही पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता.