कोची – उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर उपाध्याय यांची भावजय नाझिया युसूफ यांना गुरुवारी कोची विमानतळावर अटक करण्यात आली. नाझिया हिला ती सिंगापूरला जात असताना अटक करण्यात आली आहे,
तिच्याविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. नाजिया युसूफ या सचिन उपाध्याय यांच्या पत्नी आहेत, सचिन उपाध्याय हे भाजपचे आमदार किशोर उपाध्याय यांचे भाऊ आहेत. सचिन उपाध्याय आणि त्याची पत्नी नाझिया युसूफ यांच्यावर राजपूर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूकप्रकरणी खटला सुरू आहे.
अटक झाल्यानंतर सचिन आता जामिनावर असून नाझिया 2017 पासून फरार होती. जिल्हा पोलिसांनी तिला पकडून देणाऱ्यांसाठी 15,000 रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. तिला गुरुवारी कोची विमानतळावर सुरक्षा पथकाने अटक केली.