अहमदाबाद : आयपीएल 2022 मध्ये आज राजस्थान रॉयल्स विरूध्द रॉयल चॅलेंजर बेंगळुरु याच्यांत दुसरा क्वालिफायर सामना खेळला जात आहे, ज्यामध्ये या सामन्यातील विजेता संघ येत्या रविवारी गुजरात टायटन्सशी अंतिम फेरीत खेळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@rajasthanroyals have elected to bowl against @RCBTweets.
Follow the match ▶️ https://t.co/orwLrIaXo3 #TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/RxSqb19C3s
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
राजस्थान आणि बंगळुरूने या सामन्यात कोणताही बदल केलेला नाही. मागील सामन्यातील विजेता संघ कायम ठेवला आहे. आजवर बेंगळुरुला या स्पर्धेचे एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे ही यंदा मिळालेली संधी ते सोडणार नाहीत असेच चित्र दिसत आहे, त्यामुळे त्यांचेच पारडे या सामन्यात वरचढ राहणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :-
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (c), ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोस हेजलवुड, मोहम्मद सिराज
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (C&W), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल, प्रणीक कृष्णा