मनिला – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने येथे सुरू असलेल्या आशिया करंडक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिंधूसह सात्विकसाईराज रांकिरेड्डी व चिराग शेट्टी जोडीनेही दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. फुलराणी सायना नेहवालला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या यू यान जसलीन होईचा अवघ्या 42 मिनिटांत 21-16, 21-16 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला.
सात्विकसाईराज रांकिरेड्डी व चिराग शेट्टी जोडीने जपानच्या अकिरा कोगा व ताईची सैतो यांच्यावर 21-17, 21-15 अशी दोन गेममध्ये मात केली. महिलांच्या एकेरीत फुलराणी सायना नेहवालला मात्र चीनच्या वॅंग झी यी हिच्याकडून 21-12, 7-21, 13-21 असा पराभव स्वीकारावा लागला.