मुंबई – आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी जमा केलेल्या निधी घोटाळा प्रकरणी भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा कायम ठेवला आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून किरीट सोमय्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. सोमय्यांच्या जामिन अर्जावर हायकोर्टात सुनावणी पार पडली असून सुनवाणी 14 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच सोमय्यांना दिलासा मिळाला असून त्यांना 14 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. परंतु जर सोमय्यांना अटक झाल्यास 50 हजार रुपये वैयक्तिक जामीनावर सोडण्यात यावे असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात मुंबईतील माता रमाबाई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएनएस युद्धनौकेसाठी जमा केलेल्या पैशाचा अपहार केला असल्याचा आरोप माजी सैनिक भोसले यांनी केला आहे. यावरुन सोमय्यांवर चौकशी करण्यात येत आहे. सोमय्यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सुनावणी करण्यात आली असून 14 एप्रिलपर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पिता-पुत्रांना अटक करण्यात येऊ नये असे कोर्टाचे निर्देश आहेत.