मुंबई – देशात काही दिवसांपासून इंधन दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहे. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने आठवड्याभरात दुसऱ्यांदा सीएनजी-पीएनजीच्या दरात वढ केली आहे. यामुळे वाहन चालविण्याबरोबरच स्वयंपाकघरावरील महागाईचा भार वाढला आहे.
एमजीएलने मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या किमतीत 5 रुपयांनी वाढ केली आहे. आता मुंबईत सीएनजीचा दर 72 रुपये किलोवर पोहोचला आहे. याआधी 5 एप्रिललाही सीएनजीच्या दरात किलोमागे 7 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
दरम्यन, महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल रोजी व्हॅटमध्ये 10 टक्के कपात केली होती, तेव्हा एमजीएलने सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांची कपात केली होती. मात्र, केंद्राकडून झालेल्या दरवाढीमुळे हा दिलासा काही दिवसांसाठीच मिळाला.