नवी दिल्ली – आधीच महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसणार आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नैसर्गिक गॅसची किमत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन दरवाढ एक ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून लागू होणार आहे.
नैसर्गिक गॅसची किमत 6.1 डॉलर प्रति एमएमबीटीयू वरुन 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. एप्रिल 2022 मध्ये नैसर्गिक गॅसची किंमत वाढून 6.10 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली होती. आता एक ऑक्टोबर 2022 पासून यामध्ये वाढ करण्यात आली असून 8.57 डॉलर प्रति एमएमबीटीयू करण्यात आली आहे. म्हणजेच यामध्ये 40 टक्के वाढ करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली होती.
Natural gas prices hiked by 40 per cent to record levels.
Price of gas from old fields of ONGC and Oil hiked to USD 8.57/MMBTU from USD 6.1: Petroleum Planning & Analysis Cell— ANI (@ANI) September 30, 2022
घरगुती गॅसच्या दराबरोबर आता वाहतुकीच्या खर्चात देखील वाढ होणार आहे. रशिया – युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक गॅसच्या किंमतीत वाढ पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आरबीआयनं रेपो रेटच्या दरात वाढ करत सर्वसामान्यांना झटका दिला आता नैसर्गिक गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करत डबल झटका दिला आहे.