नवी दिल्ली : एकीकडे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज दिल्लीत सीएनजीच्या किमती अडीच रुपयांनी वाढल्या आहेत.
दिल्लीत आज सीएनजी 69.11 रुपये प्रतिकिलो मिळत आहे. त्याचवेळी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 71.67 रुपये प्रति किलो दराने CNG उपलब्ध आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने गेल्या काही दिवसांत सीएनजीच्या दरात वाढ केली आहे.
IGL च्या घोषणेनंतर, CNG च्या नवीन किंमती आज सकाळी 6 वाजल्यापासून दिल्ली-NCR मध्ये लागू करण्यात आल्या आहेत.
याआधी, 6 एप्रिल 2022 रोजीही सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ केली आहे. 1 एप्रिल रोजी दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.
विविध शहरांमध्ये सीएनजी दर :
दिल्ली – 69.11 रुपये प्रति किलो
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – 71.67 रुपये प्रति किलो
मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली – 76.34 रुपये प्रति किलो
गुरुग्राम – 77.44 रुपये प्रति किलो
रेवाडी – 79.57 रुपये प्रति किलो
कर्नाल, कैथल – 77.77 रुपये प्रति किलो
कानपूर – 80.90 रुपये प्रति किलो
अजमेर, पाली – रु.79.38 प्रति किलो