बीड – अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गणेश गोपाळराव मोरे, वय 40 असे अपघातात मृत्यू झालेल्या तालुका उपप्रमुखाचे नाव आहे. हा अपघात बीड- मांजरसुंबा महामार्गावरील हॉटेल बळीराजासमोरील मंझेरी फाटा येथे झाला.
मोरे हे शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास बीडहून लिंबागणेश या त्यांच्या गावी दुचाकीने जात होते. दरम्यान बीड- मांजरसुंबा महामार्गावर मंझेरी फाट्यावरील हॉटेल बळीराजासमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात मोरे दुचाकीसह रस्त्यावर कोसळले त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागवा व त्यामध्येच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.
मोरे यांच्या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीसांनी धाव घेतली व महामार्ग पोलीसांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. मोरे यांच्या पश्चात आई ,एक भाऊ ,पत्नी, मुलगा असा परिवार आहे.