नवी दिल्ली – अमेरिकेच्या राष्ट्रपतीला खोकला झाला हे पंतप्रधानांना माहित असते. फक्त यूपीतील शेतकरी मोकाट जनावरांमुळे त्रस्त आहे, याची माहिती त्यांना नव्हती, असा उपरोधिक टोमणा मारत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधाण साधले.
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची आज अमेठीत सभा झाली. यावेळी बोलताना दोन्ही भावंडांनी पंतप्रधानाचा समाचार घेतला.
प्रियंका गांधी म्हणाल्या, निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यूपीच्या शेतकऱ्यांच्या समस्या आठवल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपतीला खोकलतो आहे हे त्यांना माहित होते. फक्त यूपीतील शेतकरी कशामुळे त्रस्त झाला आहे हे माहित नव्हतं. उत्तरप्रदेशातील शेतकरी मोकाट जनावरांमुळे परेशान झाला आहे याची माहिती व्हायला पंतप्रधानांना पाच वर्षे लागली आहेत.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, यूपीत कोणाची सत्ता आणायची हे आपल्या हातात आहे. मतदान करणे आपला हक्क आहे. भविष्यात पश्चाताप करावा लागणार नाही याचा विचार करून पुढचे सरकार निवडा. पुढच्या पाच वर्षांपर्यंत यूपीचा गाडा कोण हाकणार याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असेही त्या म्हणाल्या.