नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे भारतीय बाजारात बुधवारी सोन्याचा दर 125 रुपयांनी घसरून 47,837 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 339 रुपयांनी कमी होऊन 61,477 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,799 डॉलर व चांदीचा दर 22.67 डॉलर प्रति औंस झाला. आगामी काही काळ सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, भारतातील दागिने उत्पादकांना सोन्याच्या आयात शुल्कात कपात होण्याची अपेक्षा होती. मात्र याकडे अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे दागिने उत्पादकांच्या संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.