बारामती – सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात विरोधकांनी टीका केली आहे. भाजपने विरोध करताना राज्याला मद्यराष्ट्र करण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप केला होता. आता वाईन विक्रीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले,’राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही.जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही.’
देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत 18 वायनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतलातरी वाईट वाटायचे कारण नाही.