महाळुंगे इंगळे – पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीच्या 2020-2021 शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे.शाळेतील 25 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.
शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले विद्यार्थी; ओंकार धुमाळ, संतोष ताठे, वैष्णवी धुमाळ, श्रेयश घनवट, श्रीनाथ लोखंडे, श्रेयस घाडगे, सार्थक धुमाळ, प्रतिक जाधव, श्रावणी मरळ, समर्थ गवळी, समीक्षा धुमाळ, स्नेहा धुमाळ, श्रेया धुमाळ, सुशांत गावडे, तेजस्विनी शिंदे, समीक्षा धुमाळ, साहिल धुमाळ, राजलक्ष्मी रुके, तनुजा धुमाळ, शरण्या धुमाळ, यश धुमाळ, पूर्वा धुमाळ, निखील सुरसे, सुरज देव्हारे, ओंकार धुमाळ.
यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक वर्गशिक्षक अण्णासाहेब गैन्द, रंजना कांदळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता धुमाळ यांचे सरपंच सुप्रिया धुमाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियंका धुमाळ, आजी-माजी पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शालेय समिती सदस्य, ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.