पुणे – जिल्ह्यात तापमानात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने घट होत आहे. पहाटे दाट धुके आणि दिवसभर हवेतील गारवा यामुळे पुणेकरांना पुन्हा एकदा गुलाबी थंडीची आनंद मिळत आहे. पुढील आठवडाभर शहरात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातील थंडीने आता महाराष्ट्रातही आपला जम बसविण्यास सुरवात केली असून, पुण्यासाहित राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे.
शहरात सोमवारी किमान तापमान 11.2, तर कमाल तापमान 27.8 अंश सेलिअस इतके होते. मागील आठवडाभरापासून गायब झालेल्या थंडीचे शहरात पुनरागमन झाल्याने नागरिकही थंडीपासून सुरक्षेसाठी योग्य खबरदारी घेत आहेत. नागरिक दिवसभर स्वेटर, हातमोजे-पायमोजे, स्कार्फ घालून फिरताना दिसत आहेत.