मुंबई – टीव्ही स्टार नेहमीच पडद्यावर प्रेक्षकांना हसवत असते. आतादेखील तिने प्रक्षकांबरोबर टीव्ही कलाकारांच्या चेहऱ्यावर एक हास्य आणले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमधून हा आनंदाचे कारण भारतीने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे.
भारतीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये भारतीचा नवरा हर्ष लिंबाचिया, जस्मीन भसीन, अली गोनी आणि इतर अनेकजण दिसत आहेत. या सगळ्यांच्या मध्यभागी असलेली भारती सिंह आणि तिचे बेबी बंप उठून दिसत आहे. भारती सिंहकडे गुडन्यूज आहे, हे चाहत्यांना सांगण्यासाठी बारतीने लढवलेली युक्ती कमाल होती.
भारतीने स्वतःचा एक व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती आपल्या प्रेग्नन्सी टेस्टचा रिपोर्ट चाहत्यांशी ती शेअर करताना दिसते आहे. ही न्यूज शेअर करताना स्वतः भारतीला आनंद लपवता येत नाही आहे. ती आनंदाने चक्क भांगडा करायला लागलेली दिसते आहे.
यापूर्वी भारतीच्या एका मैत्रिणीने भारतीच्या प्रेग्नन्सीबद्दल सूतोवाच केले होते. याच कारणामुळे भारतीने काही दिवस आपल्या कामातून सुट्टी घेतली आहे. तिने कपिल शर्मा शो मधून देखील थोडे दिवस ब्रेक घेतला आहे. पण तिने पूर्वी या ब्रेकचे कारण सांगितलेले नव्हते.