मुंबई – विकी कौशल आणि कतरिना कैफचा राजस्थानातील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स या हॉटेलमध्ये 9 डिसेंबरला शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह समारंभाचे फोटो मोठ्या मुश्कीलीने मीडियाला मिळाले होते.
मात्र लग्नाला दोन दिवस झाले तरी अद्याप कोणत्याही न्यूज चॅनेलने या लग्नाचे व्हिडीओ दाखवलेले नाहीत. त्याचे कारण विकी आणि कतरिनाने आपल्या विवाह समारंभाला अगदी खाजगी स्वरुप दिले होते. त्यांनी लग्नाच्यावेळी नो फोन पॉलिसी अवलंबली होती. पाहुण्यांना आपले फोन बाहेरच ठेवायला लागले होते.
एवढी खबरदारी घेण्याचे कारण म्हणजे या विवाह समारंभाचे व्हिडीओ राईट अमेझॉनला विकले गेले आहेत. थोडेथोडके नाही तर तब्बल 80 कोटी रुपयांना हे राईट विकले गेले आहेत.
या विवाह समारंभावरील एक डॉक्युड्रामा ओटीटीवर शानदार सादरीकरणातून दाखवले जाणार आहे. त्यासाठीच रे व्हिडीओ राईट विकले गेले आहेत, असे बोलले गेले.
मात्र ही निव्वळ अफवा असल्याचेही बोलले जाते आहे. विकी आणि कतरिनाने अमेझॉनबरोबर असा कोणताही करार केलेला नव्हता, असे आता बोलले जाते आहे. नक्की काय ते लवकरच समजेल.