नवी दिल्ली – लहान मुले खेळतांना काय करतील याचा काही नेम नाही. लहान मुलांना नेहमीच बघत राहावे लागते लक्ष नसताना लहान मुलं असं काही करतात, जी गोष्ट अनेकदा धोकादायक असते. अशी एक घटना झारखंडमधील गुमला भागात घडली आहे.
या गावातील एकाच कुटूंबातील तीन चिमुकल्यांनी खेळता खेळता मुलांनी विष घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटूंबातील तीन चिमुकले नेहमी प्रमाणे खेळत होते यावेळी खेळतांना त्यांनी नकळत खोलीतील किटकनाशकांची बाटली ठेवली होती. कुणाच्याही नकळत या मुलांनी ती बाटली घेतली आणि त्यातलं विष मुलांच्या पोटात गेलं.
यामुळे ते खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडले. थोड्या वेळात मुलांचा खेळण्याचा आवाज येत नसल्यामुळे आत घरच्यांनी येऊन बघितले तेव्हा तिथे हे तीन चिमुकले बेशुद्ध अवस्थेत दिसले. त्यांना घरच्यांनी तत्परता दाखवत रुग्णालयात नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून या चिमुकल्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेमुळे घरच्यांना जबर धक्का बसला असून तिघेही लवकर बरे व्हावेत, यासाठी ते प्रार्थना करत आहेत.