पुणे – आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचार्यांनी दिवाळीच्या काळात राज्यभर आंदोलन पुरकरले, मात्र मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.
दरम्यान, यासोबतच गुरूवारीच राज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित केले आहेत. यात सर्वाधिक पुणे विभागातील 148 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत. राज्यातील एसटी कर्मचारी अद्यापही आंदोलनातून माघार घेत नसल्याने आता सरकारकडून आता कारवाईचा बडगा उचलला जात आहे.
यातच या निलंबन कारवाईत अधिकृतरित्या प्रसूती रजेवर असलेल्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, लातूर तालुक्यातील मुरुड इथे राहणाऱ्या सारिका कोद्रे-लाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्या लातूर डेपोमधील महिला वाहक म्हणून काम करीत होत्या त्यांची नुकतीच प्रसूती झाली होती. त्या अधिकृतरित्या प्रसूती रजेवर होत्या. मात्र असे असतांना सुद्धा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या 16 वर्षांपासून एसटी महामंडळात सारिका कोद्रे-लाड सेवा बजावीत आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांना अधिकृतरित्या प्रसूती रजा देखील देण्यात आली होती. मात्र निलंबनाच्या कारवाई त्यांचे निलंबन केल्यामुळे सारिका कोद्रे यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे.
त्या या कारवाईबाबत म्हणाल्या,’अधिकाऱ्यांने आणि कशा पद्धतीने माझ्यावरती कारवाई केली आहे ते महामंडळाने सांगावं आणि माझ्यावरती चुकीची कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरती त्वरीत कारवाई करावी. असेही त्या म्हणाल्या आहे.