मुंबई – बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची हॉट गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा हे सध्या मालदीवच्या बीचवर वेकेशन एन्जॉय करत आहेत. या दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर मालदीवचे फोटो शेअर केले आहेत. मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपले काही हॉट फोटो पोस्ट केले असून, यामध्ये ती प्रचंड मादक दिसत आहे. आपल्या हॉटनेसने मालयकाने मालदीवचं ही तापमान वाढवलं आहे.
तर, दुसरीकडे अर्जुनने सुद्धा आपला एक हाफ सेल्फी शेअर करत चाहत्यांना विचारलं होतं ओळखा मी कुठे आहे? बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चित कपल्सपैकी एक म्हणून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला ओळखलं जातं.
अर्जुन कपूर हा मलायकासोबत नेहमीच क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतो. सध्या या दोघांचे हे फोटो व्हायरल होत असून, त्यांच्या फॅन्सने या फोटोंवर कमेंट अँड लाईक्सचा वर्षाव केला आहे.