आळंदी – येथील एस. के. उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माऊली कुऱ्हाडे यांची श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या सल्लागार समितीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे, असे पतसंस्थेचे चेअरमन शिवाजीराव गवारे यांनी सांगितले आहे.
माऊली कुऱ्हाडे यांची श्री स्वामी समर्थ पतसंस्थेच्या सल्लागार समितीच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा श्रीक्षेत्र आळंदी येथे उद्योगपती रमेश गव्हाणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहन कुऱ्हाडे,दत्तनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश कुऱ्हाडे, शुभम जाधव, अमित कुऱ्हाडे, सौरभ गव्हाणे, तेजस कुऱ्हाडे, ललित भागवत, सचिन कुऱ्हाडे, दिनेश कुऱ्हाडे उपस्थित होते.