कांजूरमार्ग – मुंबईतील कांजूरमार्ग येथे असलेल्या सॅमसंग सर्विस सेंटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही आग काल रात्री लागली आहे. ही भीषण आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक माहितीमधून समजले आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कांजूरमार्ग : सॅमसंग सर्विस सेंटरला भीषण आग pic.twitter.com/0xsL30jHI3
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) November 16, 2021
कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्विस सेंटरला काल रात्री भीषण आग लागली आहे. या सर्विस सेंटरमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे असल्याकारणाने आगीमध्ये स्फोट होऊन जास्त भडके उडाले. या घटनेची माहिती मिळताच तेथील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र या आगीत सर्विस सेंटरमधील सामान जळून खाक झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.