मुंबई – साऊथचे मेगास्टार शिवाजीराव गायकवाड म्हणजेच, अभिनेते रजनीकांत यांना चेन्नईमधील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार,रजनीकांत हे नियमीत आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले असता त्यांना दाखल करुन घेण्यात आलं आहे.
दरम्यान, अभिनेते रजनीकांत’यांना 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्यात आला.
रजनीकांत यांनी १९७५ साली चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. के भालचंद्र यांच्या अपूर्वा रागंगल या चित्रपटामधून त्यांनी आपल्या कारर्किदीचा श्री गणेशा केला. रजनीकांत हे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये ४५ वर्षांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. ‘बिल्लू’, ‘मुथ्थू’, ‘बासाह’, ‘शिवाजी’, ‘इथीरान’ यासारखे त्यांचे चित्रपट चांगलेच गाजले आहेत.