लंडन – सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या विविध निगेटिव पोस्टवर दोन मिनिटे जरी व्यतीत केली तरी संपूर्ण दिवस खराब होतो असा निष्कर्ष एसएक्स विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे.
करोना महामारी च्या काळात लोकांनी सोशल माध्यमातील नकारात्मक मजकूर वाचला किंवा ऐकल्यामुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचेही या संशोधनात म्हटले आहे.
या संशोधनात काही लोकांना महामारी संदर्भातील सकारात्मक आणि नकारात्मक स्टोरीज वाचायला देण्यात आल्या तेव्हा ज्या लोकांनी नकारात्मक स्टोरीत वाचल्या होत्या त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे लक्षात आले.
तर सकारात्मक परिणाम स्टोरीज वाचणार्या लोकांवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही या संशोधनाचे टीमचे नेतृत्व करणाऱ्या डॉक्टर कॅथरिन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महामारीच्या कालावधीत सोशल माध्यमात नकारात्मक पोस्टचे प्रमाण वाढले होते या स्टोरीज लोकांनी जास्तीत जास्त वाचाव्यात यासाठी विशेष प्रयत्नही करण्यात येत होते त्याचा मोठा परिणाम लोकांवर झाला.
सोशल मीडियावर नकारात्मक पोस्ट प्रसारित करण्याचा ट्रेंड सध्या वाढला असून यापैकी अनेक पोस्ट खऱ्या नसतात किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असतात पण याची कल्पना वाचणाऱ्यांना येत नसल्याने त्यांचा मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होतो असे या संशोधनात म्हटले आहे.
दोन मिनिटे समाज माध्यमावरील निगेटिव्ह स्टोरी वाचल्यामुळे जर हा फरक पडत असेल तर समाज माध्यमांवर कोणत्या पोस्ट वाचायच्या याचे योग्य निर्णय वापरकर्त्यांनी घ्यावा असा सल्लाही या संशोधकांनी दिला आहे.