नवी दिल्ली : बऱ्याचदा आपल्या सर्वांना इंटरनेटच्या स्लो स्पीडमुळे खूप त्रास होतो. जर आपण काही महत्त्वाचे काम करत असू आणि इंटरनेटचा वेग कमी झाला तर सगळेच काम बिघडते. एवढेच नाही तर आपल्यापैकी जे गेमचे वेडे आहेत त्यांनाही यामुळे हात चोळत बसावे लागते. अशा परिस्थितीत आपण सर्वजण आपल्या राऊटर किंवा ब्रॉडबँडच्या इंटरनेट स्पीडला गती देण्यासाठी अनेक उपायाचे अवलंब करतो, पण त्यावर उपाय फारसा निघत नाही. आपण घेतलेला ब्रॉडबँड प्लान वेगळाच असतो, अनेक वेळा इंटरनेटचा स्पीड त्यापेक्षाही हळू चालतो. या भागात, आज आम्ही तुम्हाला अशी एक युक्ती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्रॉडबँडचा किंवा राऊटरचा इंटरनेट स्पीड वाढवू शकता.
* इंटरनेटच्या मंद गतीचे एक मोठे कारण हे देखील असू शकते की आपले डिव्हाइस आणि राउटरमधील अंतर जास्त असणे. जास्तीच्या अंतरामुळे इंटरनेट खूप संथपणे चालू होते. या व्यतिरिक्त, इतर अनेक कारणे आहेत, ज्यामुळे राउटरचे इंटरनेट संथ चालते.
* प्ले स्टोअरवर असे अनेक ऍप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही वायफाय चॅनेल आणि फ्रिक्वेन्सीला ऍनालाईज करू शकता. जर हे ऍप कमकुवत चॅनेलबद्दल सूचित करेल, तर आपल्याला सेटिंग्जमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. यासाठी ब्राउझरवर जा आणि ब्रॉडबँड सेटिंग्जमध्ये लॉग इन करा.
* चॅनेलमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला वायरलेस सेटिंगवरून ऍडव्हॅन्सड सेटिंगवर जावे लागेल. त्यानंतर तेथे ऑप्टिमम कनेक्शन निवडा. निवड केल्यानंतर ती सेटिंग सेव्ह करा. त्यानंतर राउटर रीस्टार्ट करा. असे केल्यावर तुमचा इंटरनेट स्पीड वेगाने चालू होईल. जर हे केल्यानंतरही इंटरनेटच्या गतीसंदर्भात काही समस्या असेल तर आपण यासंदर्भात आपल्या इंटरनेट प्रदात्याशी संपर्क साधावा.