माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्थांनी महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन दिले. त्यापैकी स्वप्नाली दोशी यांनी स्वतःचा उद्योग यशस्वी करतानाच इतर महिलांना उद्योजक बनण्यासाठी प्रशिक्षण दिले.
चॉंकलेट बनविणे हा माझा छंद. याछंदाचे उद्योगात रुपांतर करण्याची किमयासाध्य झाली ती केवळ माणदेशीमुळेच…कामोठे (नवी मुंबई) येथील स्वप्नाली दोशीसांगत होत्या. चॉंकलेट बनविताना असंवाटले की रोजच्या जीवनातील गरजेचे हेल्दीफूडचे उत्पादन केले तर…
असा विचारत्यांच्या मनात आला. माणदेशीचे मार्गदर्शन मिळाले. अभ्यास केला आणि सरबत तयारकरण्याची पावडर तयार करण्याची कल्पनापुढे आली. या उत्पादनातील मोठमोठ्या
ब्रॅंन्डची स्पर्धाही त्यांनी लक्षात घेतली.
म्हणून त्यांनी ग्लुकोज, साखर, काळेमीठ, जिरे असे घटक निवडून वेगवेगळ्यास्वादांची सरबत पावडर तयार केली. पावडरपाण्यात मिसळली की मिनिटात टेस्टी सरबततयार. एनर्जी आणि पचनासाठी चांगले.त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळू लागला. माणदेशीच्या दादर येथील महोत्सवातसरबताचा स्टॉंल लावला.
पहिल्याच दिवशीनेलेली सर्व पाकिटे संपली. रात्रभर जागूनदुसऱ्या दिवसासाठी पाकिटे तयार करायची असे प्रदर्शन संपेपर्यंत करावे लागले, असाप्रतिसाद मिळाला. आत्मविेशास वाढला.माणदेशीने केक तयारकरण्याचे प्रशिक्षण दिले. डीजिटल प्रशिक्षण, पॅंकेजिंग,ब्रॅंन्डिंग, आँनलाइन व्यवहार, फेसबुक,व्हाटसअँप स्टेटस असे प्रशिक्षण देतानाच माणदेशीने उद्योजकता वाढविण्यासाठी कार्यशाळा, विविध भेटीच्या उपक्रमातून खूप काही मिळालं.
चॉंकलेट, केक, सरबत पावडर..माणदेशीची प्रदर्शन. इतर प्रदर्शने. असे सुरूझाले. संपर्क वाढत गेला. ओळखी वाढतगेल्या. प्रतिसाद वाढला. साताऱ्यातीलप्रदर्शनात वेगळा अनुभव मिळाला. 9 मार्च2018 मध्ये सुरू झालेला त्यांचा प्रवासअधिक गतीमान झाला. तो स्वतःपुरतामर्यादित न राहता इतर महिलांसाठीही सुरुझाला.लॉंकडाऊपूर्वी दोन महिने उत्पादनासाठीयुनिट सुरु केलं. पण नुसते भाडे भरावेलागत असल्याने ते बंद करावे लागले.
घरातूनच आँर्डर पूर्ण करणे सुरु केले. आवळा कॅंडी, केकसह सर्वउत्पादनांची स्टेटस पाहून मागणीवाढली. लॉंकडाऊनच्या काळात केक तयार करण्याचे आँनलाइन प्रशिक्षण सुरु केले. महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला. पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळण्यातअडचणी होत्या. स्वप्नाली यांनी त्यातून मार्ग काढला.
ओळखींमुळे थेट कंपनीतूनकच्चा माल मिळवून गरजू महिलांना घरपोच करु लागल्या. केक, आइस्क्रिमसह आँनलाइन प्रशिक्षण सुरु झाले. संकट हीच संधी मानून आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आगळे ठरले. या प्रशिक्षणाच्या प्रतिसादामुळे इतर काही संस्था त्यांना ट्रेनर म्हणून बोलावू लागल्या.
पुणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्या प्रशिक्षक म्हणून जाऊ लागल्या. महिलांना उद्योजिका म्हणून
घडविण्याची प्रेरणा त्यातून मिळाली. आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून वेगवेगळ्या महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. माणदेशी महिला उद्योजिकांचा स्वतःच्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.
व्यावसायिकता त्यांच्या रोमारोमांमधून दिसते. व्यवसाय सुरु करायचा किंवा वाढवायचा असे ठरवतात त्यावेळी त्या व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करतात, उत्पादनाच्या क्वालिटीपासून ते मार्केटिंगपर्यंत सर्वांगीण अभ्यास करतात, असे माणदेशीच्या प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितले. डीजिटल टूलचा व्यवसायासाठी वापर करुन स्वप्नालीताईंसारख्या महिला महिन्याला 90 हजारांपासून तर सीझनला अडीच लाखांपर्यतची उलाढाल करतात.
ग्राहकांचे फिडबॅंक पॉंझिटिव्हली घेऊन आपल्या व्यवसायात मागणीप्रमाणे योग्य बदल करण्यामुळे स्वप्नालीताईंनी यश मिळवले आहे. माणदेशीतून सुरु झालेला त्यांचा प्रवास उद्योजिका म्हणून स्थिर झाल्यावर आता त्या इतर महिलांसाठी ट्रेनर म्हणून काम करेपर्यंत पोहचला आहे. अनेक कॉंलेजेस किंवा संस्था त्यांना ट्रेनर म्हणून बोलावतात.
त्यांना स्वतःची कंपनी काढायची असून महिलांना जॉंब (रोजगार) द्यायचा आहे. नविष्का क्रिएशन हा स्वतः चा ब्रॅंण्ड त्यांनी विकसित केला, असे वनिता शिंदे यांनी स्पष्ट केले. माणदेशी उद्योजिकांनी स्वतःचे ब्रॅंन्ड तयार केले, त्या ब्रॅंन्डने त्यांची ओळख निर्माण झाली. त्या राहतात, त्या परिसरात त्यांच्या कामाविषयी अभिमान व्यक्त होतो, यापेक्षा मोठी शाबासकी ती काय असते, असे त्या नमूद करतात. उद्योग यशस्वी करीत स्वप्नाली दोशी यांनी प्रशिक्षणातून घडविल्या महिला उद्योजिका