सातारा -जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 353 नागरिकांचे अहवाल करोना बाधित आले असून 6 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
तालुकानिहाय करोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 5 (9866), कराड 54 (38265), खंडाळा 10 (13923), खटाव 42 (24637), कोरेगाव 34 (21323), माण 38 (17170), महाबळेश्वर 5 (4601), पाटण 5 (9996), फलटण 79 (35526), सातारा 54 (49900), वाई 13 (15493) व इतर 14 (15493) असे आज अखेर एकूण 2,42,659 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या खंडाळा 1, कोरेगाव 1,
माण 1, सातारा 2, वाई 1 असे एकूण 6 असून आजअखेर जिल्ह्यामध्ये एकूण 6047 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 1093 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.