सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजी “टायगर’च्या आगामी चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. “टायगर-3’मध्ये सलमान खानसह कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी झळकणार आहे.
यात इमरान हाश्मी हा खलनायकाची भूमिका साकारत आहे. सलमान आणि इमरान हाश्मी यांच्यातील टक्कर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्साहित आहे.
आता या चित्रपटाच्या शूटिंगसाठी सलमान खान आणि कतरिना कैफ हे रशियाला रवाना झाले आहेत. याप्रसंगी हे दोन्ही कलाकार विमानतळावर स्टार ब्लॅक लुकमध्ये स्पॉट करण्यात आले. मुंबई विमानतळावरील सलमान खान आणि कतरिना कैफ यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कतरिना कैफही कारमधून उतरल्यानंतर थेट विमानतळावर पोहोचली, तर सलमान खानने प्रसिद्धी माध्यमांना पोज दिल्या. कतरिना आणि सलमान खान हा रशियानंतर विविध देशांमध्ये “टायगर-3’चे शूटिंग करणार आहेत.
ते पुढील 45 दिवसांमध्ये 5 युरोपियन देशांमध्ये हे शूटिंग करणार असल्याचे समजते. याप्रसंगी “टायगर-3’चे 150 कास्ट आणि क्रू मेंबर्सनी रशियाला उड्डाण केले आहे.