रणवीर सिंह आणि अलिया भट यांनी त्यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी”च्या पहिल्या शेड्युलच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. स्वतः करण जोहर या सिनेमाचे डायरेक्शन करत आहे. या सिनेमाच्या शूटिंगचे या सेटवरील एक व्हिडीओ रणवीरने आजच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
या व्हिडीओमध्ये सेट उभारणी आणि स्क्रिप्टच्या वाचनाचे सेशन दिसते आहे. आपल्या सहकाऱ्यांना करण जहर सूचना देताना दिसतो आहे. “रॉकी और रानी…’ अगदी तयार आहे. चला यांच्या प्रेमकहानीला सुरुवात करुया.’ असे तो म्हणताना दिसतो आहे. या व्हिडीला रणवीरनेही भन्नाट कॅप्शन दिली आहे.
“रॉकी और रानीची प्रेमकहानी सुरू झाली आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला मिळू देत आणि या प्रेमाच्या सफरीमध्ये आमच्याबरबर सामील व्हा.’ असे त्याने म्हटले आहे. “रॉकी और रानी…’मध्ये रणवीर आणि आलियाबरोबर धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी देखील असणार आहे. सिनातील बाकीचा तपशील अजून समजायचा आहे.