मुंबई – सध्या करोना निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी, अनेक कामं प्रलंबित आहेत. अनेक परीक्षांचे नाकाल लागले नाही. मात्र यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. विद्यार्थी तणावात असून एका विद्यार्थ्याने तणावात थेट मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
मुंबई विद्यापीठाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा दुसरा, बीकॉमचा विद्यार्थीच आहे. बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास कॅम्पस बॉम्बनं उडवण्याची धमकी या विद्यार्थ्यांनं दिली होती.
प्रलंबित निकालामुळे मानसिक तणावात असलेल्या या विद्यार्थ्यानं शिवीगाळ असलेला ईमेल मुंबई विद्यापीठाला पाठवला होता. सायबर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना शोध घेतला. त्यानंतर या विद्यार्थ्याला वॉर्निंग आणि नोटीस देत सोडून दिलं आहे.
मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये मुंबई विद्यापीठाला 9 आणि 10 जुलैला आलेल्या ईमेल प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या तपासादरम्यान पोलिसांना या विद्यार्थ्याचा शोध लागला.