नवी दिल्ली – अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात चिपमंक्स नावाचा जीवाला प्लेगचा संसर्ग झाल्याचं समोर आला आहे. चिपमंक्स हा छोट्या आकाराच्या खारींचा प्रकार आहे. यामुळे येथील राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने काही परिसर बंद केले आहेत. जेणेकरून नागरिकांची येथे वर्दळ होऊ नये.
बंद करण्यात आलेल्या स्थळांमध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ साऊथ लेक ताहो, कीवा बीच आणि टेलर क्रीकचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नियमित तपासणीदरम्यान, उंदीर, गिलहरी आणि इतर उंदीर सारख्या प्रजातींचे साउथ लेक टाहोमध्ये परीक्षण करण्यात आले. ज्याचा अहवाल स्थानिक वृत्तपत्रे आणि माध्यम संस्थांमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
दरम्यान द टाहो डेली ट्रिब्यूननुसार, आत्तापर्यंत कोणत्याही मनुष्य जातीत या प्लेगचा संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. कॅलिफोर्नियाच्या काही भागात प्लेगला कारणीभूत असणारा जीवाणू येर्सिनिया पेस्टिस सामान्यतः आढळतो. यामध्ये, एल डोराडो काउंटीचे दक्षिण लेक टाहो हे भाग प्रमुख आहे.
गेल्या वर्षी दक्षिण लेक टाहो परिसरात एका माणसाला प्लेगची लागण झाली होती. गेल्या पाच वर्षांत नोंदवलेले हे पहिलेच प्रकरण होते.