चंदिगढ – ट्रक- दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सफीदो येथील जींद रोडवरील पीजी काॅलेजजवळ मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. अशोक (34), शुभम (18), सुमित (19), मनीष (21) अशी अपघातात मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत.
मृत सर्व वेल्डिंगचे काम करत असत. मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता चौघे एका दुचाकीवरून कामावर निघाले होते. जींद रोड येथील पीजी काॅलेजजवळ पोहोचताच त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या रोडवर गोदामे असल्याने येथे ट्रकची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यावेळी ओव्हरटेक करताना बाईकची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. या अपघातात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.