अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथे बुधवारी (दि. 30) कोविडयोद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, ग्रामसेवक, सरपंच यांसह सर्व कर्मचारी तसेच करोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील, तलाठी, कृषी अधिकारी, रेशन दुकानदार,, लसीकरण मोहिमेसाठी राबलेला शिक्षक वर्ग आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते मारुती अवघडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आयोजन आनंद चव्हाण, मिलिंद खरात, जॉन साबळे, आबासाहेब लावंड, पप्पू खरात, अतुल पताळे यांनी केले होते.