पुणे – महावितरणच्या रोहित्रातून १०० किलो तांब्याची तार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चोरीला गेलेल्या तारेची किंमत ३७ हजार रुपये एवढी आहे.
याबाबत महावितरणमधील तांत्रिक कर्मचारी किरण गावडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हवेली तालुक्यातील मौजै कोरेगाव पार्क परिसरात महावितरणचा रोहित्र आहे.
चोरट्यांनी महावितरणच्या रोहित्रातून १०० किलो तांब्याची तार चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी तांब्याची तार चोरताना रोहित्राची तोडफोड केल्याने त्यातील २०० लिटर सांडल्याचे गावडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार बी. ए. होले तपास करत आहेत.