लॉकडाऊनच्या काळात मौनी रॉयने स्वतःला खूपच बिझी ठेवले होते. गरजवंतांना उपचारांसाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त आपली मदत योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल, याचीही ती काळजी घेत आहे.
View this post on Instagram
ती सध्या दुबईमध्ये आहे आणि आपल्या फॅन्ससाठी एक सरप्राइज देण्याची तयारी करते आहे. तिने अलीकडेच मोना कट्टन शो साठी शूटिंग केले आहे. या शोसाठी तिने आपल्याला आवडणाऱ्या काही कुकिंग रेसिपी करून दाखवल्या आहेत.
View this post on Instagram
मोना ही हुडा कट्टनची बहीण आहे. तसेच ती एका लोकप्रिय ब्यूटी ब्रॅन्डची पार्टनरदेखील आहे. एका वेगळ्या ब्रॅन्डसाठी काम करण्याचा अनुभव वेगळा होता, असे मौनीने म्हटले आहे.
View this post on Instagram
मौनी आणि मोना या दोघींना एकाच शोमध्ये एकत्र बघण्याचा अनुभव भन्नाट होता. दोघीजणी अगदी बहिणी वाटाव्यात याप्रमाणे दिसत होत्या.
View this post on Instagram
टीव्हीच्या दुनियेत मौनी नागिनच्या रोलमुळे प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर तिने “गोल्ड’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यामध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार दिसला होता.
View this post on Instagram