मुंबई – झायडस कॅडिलाच्या ‘व्हिराफिन’ औषधाला केंद्र सरकारकडून आपत्कालिन वापरासाठी मान्यता मिळाली आहे. देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने करोना गंभीर रुग्णांसाठी ‘व्हिराफिन’ औषधाला मान्यता दिली आहे.
करोना रुग्ण सात दिवसांत बरा होता. तसेच या औषधामुळं करोना रुग्णांना ऑक्सिजनची भासत असलेली गरज कमी होईल, असा दावा कंपनीने केला आहे. या औषधासंदर्भात राज्याच्या टास्कफोर्सचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
व्हिराफिन औषध 91.05 टक्के प्रभावी असल्याचे कंपनीने सांगितलं आहे. त्यामुळे करोना रुग्ण सात दिवसांत बरा होता. तसेच या औषधामुळं करोना रुग्णांना ऑक्सिजनची भासत असलेली गरज कमी होईल, असंही कंपनीने नमूद केलं आहे.
यावर तात्याराव म्हणाले, करोना संसर्गामुळे चिंताजनक स्थितीत असलेल्या देशातील २५० रुग्णांना व्हिराफिन हे औषध देण्यात आलं आहे. त्यापैकी १० रुग्ण मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील होते. या रुग्णांना व्हिराफिन हे इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी झाल्याचं डॉ. लहाने यांनी सांगितलं.
दरम्यान हे इंजेक्शन देऊन भागत नसून इतर उपचार सुरू ठेवावे लागतात. इतर औषधांसोबत हे इंजेक्शन दिले तर परिणाम दिसून येतात, असही ते म्हणाले. तसेच अभ्यासातून असंही समोर आलं की, व्हिराफिनचे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णांमध्ये रिकव्हरी वेगाने दिसून आली. मात्र एकट्या व्हिराफिन औषधाने भागत नसल्याचा पुनरोच्चारही डॉ. लहाने यांनी केला.