पुणे : करोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी व्यापक प्रतिबंधक लसीकरणाची आवश्यकता असून या मोहिमेत नागरिकांचे सहकार्य आणि प्रशासनाची सुसज्जता अत्यंत आवश्यक असल्याचे मत आमदार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले. वडगाव बुद्रुक चंद्रकांत उर्फ चंदर पाटील चौक येथील श्रीमती शेवंताबाई नामदेव दांगट पाटील मनपा शाळा क्र 100 जी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
वाढत जाणारा कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वडगाव बुद्रुक मधील नागरिकांना सहज लस उपलब्ध व्हावी या उद्देशाने स्थानिक नगरसेवक हरिदास चरवड , नीता दांगट, राजाभाऊ लायगुडे, राजश्री नवले यांच्या प्रयत्नातून हे लसीकरण केंद्र सुरुकरण्यात आले आहे.
यावेळी भाजप खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, नगरसेविका अश्विनी पोकळे,नगरसेवक प्रसन्न जगताप,श्रीकांत जगताप, स्वीकृत सदस्य गंगाधर भडावळे , अनंत दांगट, गणेश दांगट,बाळासाहेब नवले , संतोष परदेशी , बाबू खैर, सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे,क्षेत्रिय अधिकारी जयश्री काटकर , उपभियांता संभाजी खोत, डॉ.पखाले, उपस्थित होते.