वाघोली (पुणे) –पुणे जिल्ह्यासह शहरात पुणे विभागीय आयुक्तांनी मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे, त्यास महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चाचा विरोध आहे, असे भाजप युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी सांगितले.
यावेळी कुटे म्हणाले की, सायंकाळी 6 ते सकाळी 6 मिनी लॉकडाऊन पुणे शहर व ग्रामीण मधील अर्थव्यवस्था ढासळणारा आहे. पुणे शहर व जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. मिनी लॉकडाऊनमुळे व्यापारी, कामगार, श्रमिकांचे हाल होणार आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद ठेवल्याने सर्वसामान्य नागरिक, कामगारांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांना रोजगाराला मुकावे लागणार आहे. पीएमपीएमएल, धार्मिक स्थळे बंदचा निर्णयही अन्यायकारक आहे.