पाटना – देशभरात कुटुंबनियोजनासाठी पुरुष नसबंदी करण्यात येते किंवा महिलेवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवणं शक्य होतं. मात्र बिहारमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतरही एक महिला गरोदर रहिली आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने ग्राहक न्यायालयात धाव घेतली असून 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये फुलकुमारी ही महिला राहते. या महिलेला आधी चार मुले आहेत. घरात गरीबी असून चार मुलांचे पालन पोषण करणे कुटुंबीयांसाठी कठीण होत आहे. 29 जुलै 2019 रोजी फुलकुमारी यांनी सरकारी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली होती.
पण दोन वर्षानंतर फुलकुमारी पुन्हा गरोदर राहिल्या आहेत. या प्रकरणी फुलकुमारी यांनी डॉक्टरांच्या विरोधात तक्रार केली आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून 11 लाख रुपयांची मागणी केली आहे.
दुसरीकडे रुग्णालयाने अशा प्रकारचे एखादी शस्त्रक्रिया अयशस्वी होत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर सदर व्यक्तीला 30 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. फुलकुमारी यांच्याकडू फॉर्म भरून घेतला असून त्यांना 30 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.