शिक्रापूर (पुणे) – जागतिक महिला दिनानिमित्त शिक्रापूर येथील पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव यांनी सांभाळला. यानिमित्त पोलीस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे या वर्षी प्रथमच महिला पोलीस उपनिरीक्षक पदावर पूनम जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महिला दिनानिमित्त पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी पूनम जाधव यांच्याकडे संपूर्ण पोलीस स्टेशनचा कारभार सोपविला.
यावेळी महिला पोलीस कर्मचारी गिता बराटे, रुपाली हजारे, उर्मिला पवार, सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी, पोलीस उपनिरीक्षक शिवदास खाडे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश थोरात, जयप्रकाश चव्हाण, राजेंद्र पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय होले, प्रशांत गायकवाड, दत्तात्रय शिंदे, किशोर तेलंग, बाळासाहेब थिकोळे, प्रशांत रासकर, अविनाश पठारे, भास्कर बुधवंत, लक्ष्मण शिरसकर, अविनाश पठारे उपस्थित होते. यावेळी केक कापून महिलांचा सन्मान करत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.