- 149 नवीन रुग्णांची भर – 280 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज नवीन 149 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 9 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 93088 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजतापर्यंत शहरातील 149 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णांची नोंद झाली नाही.
आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 7 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 2336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1656 तर शहराबाहेरील 680 रुग्णांचा समावेश आहे. आज शहरातील पिंपरी, भोसरी, चिखली, निगडी येथील 7 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील आंबेगाव, आळंदी येथील 2 रुग्णांचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 280 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 89511 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3237 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 1028 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.