नवी दिल्ली – यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शन डेटानुसार, ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान 96,917 भारतीयांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये (America entry) प्रवेश केला आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांची संख्या गेल्या वर्षी पाच पटीने वाढली आहे. 2019-20 या वर्षात 19,883 भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेच्या सीमेत प्रवेश करताना पकडले गेले. (indian in US)
गेल्या वर्षी पकडलेल्या एकूण लोकांपैकी 30,010 कॅनडाच्या सीमेवर (Canada border) आणि 41,770 लोकांना मेक्सिको सीमेवर पकडले गेले. पकडण्यात आलेल्या भारतीयांचे चार श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. कुणीच सोबत नसलेले अल्पवयीन, कुटुंबातील सदस्य, एकल प्रौढ आणि सोबत नसलेली मुले यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये सर्वाधिक संख्या अविवाहित प्रौढांची आहे.
अमेरिकेचे सिनेटर जेम्स लॅंकफोर्ड यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे येणाऱ्या लोकांवर चिंता व्यक्त केली. लॅंकफोर्डने सांगितले की, लोक अनेक फ्लाइट बदलून मेक्सिकोला पोहोचतात आणि नंतर तेथील टोळ्या त्यांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेशासाठी मदत करतात. जगभरातून लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत येऊन आपल्या व्यवस्थेचा गैरफायदा घेत आहेत आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरण बनवणे अत्यंत आवश्यक आहे.
अशी आहे आकडेवारी
2020-21 – 30,662
2021-22 – 63,927
2022-2023 – 96,917