मुंबई – दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य अनुदान योजनेंतर्गत तब्बल 89 मराठी चित्रपटांना धनादेश वितरण करण्यात येणार आहे. हा वितरण सोहळा शुक्रवार, दि. 20 ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.
राज्यात फेब्रुवारी 2023 ते जून 2023 या कालावधीत एकूण 174 चित्रपट परीक्षण करण्यात आले आहेत. त्यापैकी “अ’ दर्जा प्राप्त चित्रपट 37, “ब’ दर्जा प्राप्त चित्रपट 48, राज्य-राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपट 4 असे एकूण 89 चित्रपटांना अनुदान वितरण करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 29 कोटी 85 लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे.