मांडवगण फराटा (पुणे) – कुरूळी (ता. शिरूर) येथील 62 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारा दरम्यान पुणे येथे मृत्यू झाला आहे, अशी माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली.
कुरूळी येथील 62 वर्षीय व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतू उपचारदरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (दि. 11) सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
शिरूरच्या पुर्व भागात आजपर्यंत 127 रुण आढळले आहेत. त्यापैकी 57 रूग्ण उपचार घेत आहेत. 63 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.