पुणे -खडकवासला धरण चौपाटी जवळ पाण्यात उतरण्यास पोलीस आणि पाटबंधारे विभागाने बंदी घातली अआहे. पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची फलक लावले आहे.
पाण्यात उतरण्यापासून पर्यटकांना रोखण्यासाठी पाटबंधारेने संयुक्त कारवाईला सुरुवात करणार आहे. धरण परिसरात अनेक ठिकाणी फलक लावले असून पाण्यात उतरणाऱ्यांवर 500 रुपये दंड कारवाई करणार असल्याचे यावरून नमूद केले आहे. टवाळखोरांना रोखण्यासाठीयेथे दररोज दहा सुरक्षारक्षक चौपाटी परिसरात तैनात असणार असल्याची माहिती शाखा अभियंता गिरीजा कल्याणकर यांनी दिली.